माझ्यासमोर एक खिडकी आहे
पलीकडे बाग
बागेत झाडे
निश्चल उभी
काल रात्री बहुतेक पाऊस पडून गेलेला आहे
कौलांवरून निथळूनही गेलेला
खिडकीच्या पटांमधून
उतरून आले आहेत
सावल्यांचे सम्यक गुच्छ
उजेडाच्या काही
पारमिता
दूरवर उभे निळसर हिरवे डोंगर
त्यातून वाहत जाणारे
बिलोरी ओघळ
भगव्या- तपकीरी
पाऊलवाटा
अद्याप मी
सरावलेलो नाही
बदलत्या मौसमांना
चहुवार पसरलेल्या
सावकाश रंगसंगतीला
संदेह आणि सरळतेच्या
मधल्या पट्ट्यामध्ये
मी उभा आहे
कधीचा
सहभागी असून नसल्यासारखा
एवढ्यात आलेल नाही
कुठल्याही पत्राच उत्तर
किंवा
पाठवल गेलच नाहीए
टपाल
पण म्हणून अडकून पडलेलेही नाहीत
संदेह किंवा सरळता
एवढ्यात , बाहेर
दिवसाची खुडबुड सुरू होते आहे
पंचवीस घोडे जुंपलेली गाडी
भरधाव भरण्यासाठी
टाच लावून तयार आहे.
--
अनंत ढवळे
दीर्घकविता - अजून लेखन सुरु आहे
पलीकडे बाग
बागेत झाडे
निश्चल उभी
काल रात्री बहुतेक पाऊस पडून गेलेला आहे
कौलांवरून निथळूनही गेलेला
खिडकीच्या पटांमधून
उतरून आले आहेत
सावल्यांचे सम्यक गुच्छ
उजेडाच्या काही
पारमिता
दूरवर उभे निळसर हिरवे डोंगर
त्यातून वाहत जाणारे
बिलोरी ओघळ
भगव्या- तपकीरी
पाऊलवाटा
अद्याप मी
सरावलेलो नाही
बदलत्या मौसमांना
चहुवार पसरलेल्या
सावकाश रंगसंगतीला
संदेह आणि सरळतेच्या
मधल्या पट्ट्यामध्ये
मी उभा आहे
कधीचा
सहभागी असून नसल्यासारखा
एवढ्यात आलेल नाही
कुठल्याही पत्राच उत्तर
किंवा
पाठवल गेलच नाहीए
टपाल
पण म्हणून अडकून पडलेलेही नाहीत
संदेह किंवा सरळता
एवढ्यात , बाहेर
दिवसाची खुडबुड सुरू होते आहे
पंचवीस घोडे जुंपलेली गाडी
भरधाव भरण्यासाठी
टाच लावून तयार आहे.
--
अनंत ढवळे
दीर्घकविता - अजून लेखन सुरु आहे