चाळिशीजवळ जाण्यातला भाग म्हणजे
तुम्ही तिशीपासून फार लांब नसता
आणि मागे पडून गेलेले असतात
विशीतले उनाड दिवस
मागे वळून बघण्यासाठी
बर्याच गोष्टींची
बेगमी झालेली असते
आणि बहुतेकांना
सुचू लागतात कविता
रटाळ नोंदी
जुने सिनेमे, अवघड पुस्तके
आणि इतर बेरंग तपशीलांमध्ये
अडकून पडण्याचे वय
अधून मधून
जमा खर्च
कमाईचे हिशेब
दुरावलेले लोक
शहरे
आणि हरवलेल्या श्रेयाचे
पुसट उद्वेग
मरण
तसे कुठल्याच वयाहून दूर
किंवा जवळ नसते
पण हे वय
तसे मध्यम आहे
की जगून झालेले असते बर्यापैकी
आणि उरलेले देखील
__
अनंत ढवळे
तुम्ही तिशीपासून फार लांब नसता
आणि मागे पडून गेलेले असतात
विशीतले उनाड दिवस
मागे वळून बघण्यासाठी
बर्याच गोष्टींची
बेगमी झालेली असते
आणि बहुतेकांना
सुचू लागतात कविता
रटाळ नोंदी
जुने सिनेमे, अवघड पुस्तके
आणि इतर बेरंग तपशीलांमध्ये
अडकून पडण्याचे वय
अधून मधून
जमा खर्च
कमाईचे हिशेब
दुरावलेले लोक
शहरे
आणि हरवलेल्या श्रेयाचे
पुसट उद्वेग
मरण
तसे कुठल्याच वयाहून दूर
किंवा जवळ नसते
पण हे वय
तसे मध्यम आहे
की जगून झालेले असते बर्यापैकी
आणि उरलेले देखील
__
अनंत ढवळे