Thursday, August 31, 2023

गझल

 अशात डोक्यात सुरू असलेली गझल -


सारे* रस्ते थिजून गेलेले

म्लानपण ओघळून गेलेले


अर्थ उमजेल काय स्वप्नाचा

एवढ्यातच पडून गेलेले


आपले वर्तमानही बहुधा

आपल्यातच घडून गेलेले


-


अनंत ढवळे