Saturday, March 29, 2008

निरंतर खिन्नतेची रात्र होती
उभी डोळ्यात काळी रात्र होती

अशा नात्यास कुठले नाव द्यावे
तुझ्या माझ्यात ढळती रात्र होती

कथा माझ्या तुझ्या संपून गेल्या
कधी ना संपणारी रात्र होती....

फरक हा दॄष्टीकोनाचा असावा
जो दिवस माझी रात्र होती...

अनंत ढवळे
संपर्क :९८२३० ८९६७४
कसा तुझ्या ओंजळीत गेला
दिवा समुद्रात सोडलेला

कुठे दिसेनाच स्वच्छ पाणी
जिथे तिथे गाळ साचलेला..

अशा उदासीन मध्यरात्री
घरापुढे कोण थांबलेला..

नवीन वाटांवरी निघालो,
धरून हाती परंपरेला ...

अनंत ढवळे
संपर्क :९८२३० ८९६७४